टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक शेषराव ढाकणे व बाळासाहेब गोल्हार यांचा टाकळीमानूर येथे सन्मान करण्यात आला.
टाकळीमानूर गटातून शेषराव ढाकणे व बाळासाहेब गोल्हार या दोघांना संचालक म्हणून संधी देण्यात आली. त्यांचा गावात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शहाशरीफ बाबा मंदिरात सन्मान करण्यात आला. शेषराव ढाकणे यांचा सन्मान रहमान शेख, भाऊसाहेब पवार यांनी तर बाळासाहेब गोल्हार यांचा सेवा संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारत तांबे या १४ वयोगटातील धावण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल याचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच शुभम गाडे, नानासाहेब गाडे, रावसाहेब पवार, आप्पासाहेब शिरसाट, डॉ. शिवाजी चोरमले, बाबासाहेब ढाकणे, हरिभाऊ दहिफळे, नानासाहेब ढाकणे, अर्जुन शिरसाट आदी उपस्थित होते.