शेवगाव : तालुक्यातील दहिगावने येथील कृषीविज्ञान केंद्राला शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी भेट देऊन सर्व प्रात्यक्षिक प्रयोगाची पाहणी करून माहिती घेतली. तूर बीडीएन ७११, गव्हाची एमएसीएस, ६२ २२ डाळिंब, सोलापूर हरभरा विक्रम या जाती शेतकऱ्यांच्या हमखास उत्पादन भर घालतील, असा विश्वास ढगे यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. माणिकराव लाखे यांनी विविध जिवाणू खतांच्या शेतकरी उपयुक्त उत्पादनांची माहिती दिली. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कौशिक यांनी आंब्यासाठी बांगडी ठिबक पद्धत, ओव्याची शेती, ड्रॅगन फ्रुट लागवड, कोरडवाहू फळझाडांची लागवड याबाबत माहिती देऊन रोपवाटिकेतील केशर आंबा, भगवा सुपर डाळिंब या रोपांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी नारायण निबे यांनी आभार मानले.
कृषीविज्ञान केंद्राला ढगे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST