शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडणार

By admin | Updated: August 11, 2016 01:11 IST

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत केल्या़

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत केल्या़ जिल्ह्यातील एक हजार ९३२ धार्मिक स्थळे नियमित करण्याचेही यावेळी ठरले़जिल्हा नियोजन भवनात प्रभारी जिल्हाधिकारी पालवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, महापालिका आयुक्त दिलीप गावडे, नगरपालिका प्रशासनाचे नितीन कापडणीस, नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि सर्व तालुक्यांचे तहसीलदार बैठकीस उपस्थित होते़अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे, निष्कासित करणे आणि स्थलांतरीत करण्याबाबचे न्यायालयाचे आदेश आहेत़ न्यायालयाने त्यासाठीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांचा अहवाल तयार केला आहे़ या अहवालावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली़ महापालिका व नगरपालिका प्रशासनाकडून जिल्ह्यातील धार्मिक स्थळांची माहिती देण्यात आली़ त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील १ हजार धार्मिक स्थळे नियमित करण्यास समितीने मंजुरी दिली़ मात्र सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे़ निष्कासित करण्यात येणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या ५२ असून, ते पाडण्यात येणार आहेत़ तशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या असून, धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)