शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

सत्ता असूनही आमचे चालत नाही

By admin | Updated: April 25, 2016 23:19 IST

संगमनेर : भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.

संगमनेर : भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला. युती सरकारतर्फे सोमवारी आ. भोळे यांची एकस्तरीय समिती तालुक्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी आली होती. भोळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर टंचाई आढावा बैठक झाली. तहसीलदार शरद घोरपडे, पं. स. चे सहायक गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाई ऐवजी अधिकाऱ्यांकडून युतीच्या कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीवरच अधिक ऊहापोह झाला. तालुक्यातील अधिकारी काँग्रेस आमदाराच्या दबावाखाली कामे करतात. आपली सत्ता येऊनही आम्हाला विरोधक असल्यासारखे वाटते. परवानगी नसताना प्रवरा नदीतून वाळू उपसा सुरू आहे. ५२ कोटींची वाळू चोरी झाली अन् महसूलचे अधिकारी १३ कोटीची वसुली केल्याचे सांगतात, अशा गंभीर तक्रारी शहराध्यक्ष सांगळे यांनी केल्या. तळेगाव पाणी पुरवठा योजनेची कमिटी काँग्रेसची असल्याने अवास्तव निर्णय घेतले जातात. शुद्धीकरण केंद्र बंद असल्याने दूषित पाणी प्यावे लागते. या कमिटीची चौकशी करा, अशी मागणी शरद गोर्डे यांनी केली. पेमगिरीला कायमस्वरुपी तलाठी नाही, आम आदमी विमा योजनेचा लाभ नागरिकांना मिळत नाही, असे दिलीप कोल्हे यांनी म्हटले. बैठकीत नियोजनाचा अभाव असल्याने गोंधळ उडाला. याप्रसंगी जि. प. पाणी पुरवठ्याचे उपअभियंता ए. एच. तडवी, महावितरणचे हेमंतकुमार चौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, दादा गुंजाळ, रंगनाथ फटांगरे, शाम कासार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)