शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रिमझिम पावसात ‘सर्वोदय’च्या गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:41 IST

राजूर : रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत, ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत, पदलालित्याचा आविष्कार घडवित पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध पथकांच्या अदाकारींने मंगळवारी राजूरकरांची मने जिकंली. उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात राजूर (ता. अकोले) येथील गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयाने गणरायाला निरोप दिला.

ठळक मुद्देशिस्तबद्ध मिरवणूक अदाकारीने राजूरकरांची मने जिंकली
राजूर : रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत, ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत, पदलालित्याचा आविष्कार घडवित पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध पथकांच्या अदाकारींने मंगळवारी राजूरकरांची मने जिकंली. उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात राजूर (ता. अकोले) येथील गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयाने गणरायाला निरोप दिला.परिसरातील सर्वात मोठे विद्यालय म्हणून या विद्यालयाकडे पाहिले जाते. त्यामुळेच या विद्यालयाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडेही राजूरकरांचे लक्ष लागलेले असते. यावर्षी विद्यालयाच्या दोन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी, झांज पपथकांची नृत्ये बसविली होती. प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी. पर्बत, पर्यवेक्षक ए. जी. सावंत व कार्यक्रमप्रमुख बाळासाहेब घिगे,आर. पी. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक विद्यालय-आमदार निवास-महादेव मंदिर मार्गे बाजारपेठेच्या मुख्य चौकात आली. यावेळी पावसाची रिमझिम थांबली होती. आपल्या पाल्यांची अदाकारी पाहण्यासाठी पालकांबरोबरच राजूरकरांनी गर्दी केली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी अध्यापक एन. एम. आभाळे, बी. व्ही. भोसले, बी. के. बनकर,जे. आर. आरोटे, वंदना सोनवणे, रिना चव्हाण,सुरेश शेटे, संतराम बारवकर आदींच्या मार्गदर्शनाखाली लेझीम, टिपरी व झांज पथकांनी नृत्ये सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. बाजापेठेतून पुढे मिरवणूक सरकत होती, तसतसा विद्यार्थी कलाकारांमध्ये जोश संचारत होता. सुमारे पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते. त्यामुळे शिस्तप्रिय वातावरणात कुठलाही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे जल्लोषात विद्यालयाने भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक उजगिरे व पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.