शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठा कलाकार होण्याची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:26 IST

‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

रियाज सय्यदकोपरगाव : ‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.‘अर्णव’चे बुधवारी सायंकाळी शहरातील त्याचे आजोबा सुरेश कालकुंद्री यांच्या घरी आगमन झाले. यावेळी त्याने ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद साधला. प्रकाश पारखी यांच्या ‘दिवाकर स्मृती नाट्य छटा’ या संस्थेत नाट्य अभिनयाचे धडे गिरविताना ‘पडली रे पडली’ या एकपात्री प्रयोगातून ‘अर्णव’चा रंगमंच प्रवेश झाला. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’मध्ये तब्बल १५ हजार स्पर्धकांमधून पहिल्या १५ मध्ये त्याची निवड झाली. ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. खूप चंचल असल्याने लहानपणी तो अनेक कलाकारांच्या नकला करीत असे. त्याने ‘माता अनुसया प्रोडक्शन हाऊस’ मध्ये प्रवेश घेतला. केवळ अडीच वर्षाचा असताना ‘अर्णव’ची राम रक्षा तोंड पाठ होती. ७ बाल नाट्यात त्याने काम केले.‘अर्णव’ला आतापर्यंत १३-१५ बक्षिसे मिळाली. ‘अर्णव’ने आतापर्यंत ३ लघु चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले आहे. जाहिरातींमध्येही त्याला काम करण्याची संधी प्राप्त झाली. ‘मार्गगम डान्स अकादमी’ कडून नृत्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. विशेष म्हणजे शाळेकडे दुर्लक्ष होऊनही अभ्यासात तो मागे नाही. आगामी काळात विविध भूमिका साकारून मोठा कलाकार होण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली. सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय, सोनाली बेंद्रे, उमंग कुमार, हुमा कुरेशिका, सुबोध भावे, निशिगंधा वाड, अलका कुबल, प्रवीण तरडे, अद्वैता दादरकर, सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर यासारख्या कलाकारांशी ‘अर्णव’चे जवळचे संबंध आले आहेत. त्याचा फायदा भविष्यात होऊ शकेल.यावेळी मुकुं द कालकुंद्री, आजी अनिता कालकुंद्री, सुनील कालकुंद्री, अपूर्वा एडगावकर, आई सोनाली कालकुंद्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर