शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उपायुक्तांकडून गावरान बियाणे प्रकल्पांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

अकोले : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी प्रकल्पाला राज्याचे कृषी उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी ...

अकोले : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी प्रकल्पाला राज्याचे कृषी उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी भेट देऊन पाहणी केली. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेची पाहणी केल्यानंतर ममता भांगरे यांच्या घरी नागलीच्या भाकरीचाही अधिकाऱ्यांनी आस्वाद घेतला.

अकोले तालुक्यातील गावरान बियाणे संवर्धन प्रकल्पांना भेट देऊन उपायुक्त आवटे यांनी या प्रकल्पांच्या विकासासंदर्भात सूचना केल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, त्र्यंबकेश्वरचे तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, कृषी पर्यवेक्षक सुरेश पोखरकर, दीपा मोरे, बायफचे राज्य समन्वयक सुधीर वागळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल कौठाळे, संजय पाटील, बायफ नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे, विठ्ठल सोनवणे आदींची उपस्थिती होती.

पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेला आवटे यांनी भेट देऊन कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्या सदस्यांसोबत चर्चा केली. शबरी महामंडळ नाशिक यांच्या अर्थसाहाय्याने गावरान बियाणे संवर्धन व मूल्यवर्धन प्रकल्प सुरू आहे. कोंभाळणे येथे विविध पिकांच्या वाणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. आवटे यांनी या प्रदर्शनाला भेट देत बायफचे तज्ज्ञ मार्गदर्शक संजय पाटील व बीजमाता पोपेरे यांच्याकडून गावरान बियाणांची माहिती घेतली. त्यानंतर एकदरे येथील भाताच्या बीज बँकेला त्यांनी भेट दिली. या ठिकाणी हैबत भांगरे व हिराबाई भांगरे यांच्याकडून गावरान बीज संवर्धनाबद्दल माहिती घेतली. फूड मदर ममताबाई भांगरे यांच्या शेताला भेट देऊन रबी हंगामात पेरणी केलेल्या विविध गावरान वाणांची पाहणी केली. हंगामी व बहुवर्षायू परसबागेची पाहणी करून त्यातील बारकावे जाणून घेतले. वाकी येथे अकोले तालुका महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे विविध उपक्रम त्यांनी पाहिले. ममताबाई भांगरे यांनी केलेल्या नागलीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगांच्या आमटीचाही अधिकाऱ्यांनी पाहुणचार घेतला.

फोटो आहे