शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

श्री क्षेत्र देवगड दिंडीचे ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:06 IST

महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

नेवासा : महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.ज्ञानोबा माऊली.., तुकारामाचा जयघोष करीत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली दिंडी आज सकाळी ९ वाजता पंढरपूरकडे निघाली. या दिंडीमध्ये सुमारे १ हजार ४०० महिला - पुरुष भाविकांचा समावेश आहे. प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये ठेवण्यात अलेल्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार ज्योतीप्रकाश जायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याचे अग्रभागी अश्व, झांज पथक, बँण्डपथक, पांढराशुभ्र पोशाख घालून शिस्तीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणा-या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने दिंडी सोबत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा