देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहात रविवारी नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा नगरपालिकेची विशेष सभा झाली. या सभेत मुख्याधिकारी अजित निकत यांनी सभागृहापुढे अंदाजपत्रकाचे वाचन केले. याबाबत नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात नगरपालिकेने कोणत्याही प्रकारे करवाढ न करता नागरिकांचा हिताचा विचार केला आहे. नागरिकांवर करांचा बोजा पडू नये म्हणून यावर्षी मात्र प्रशासनाने करवाढ सुचविलेली असतानाही कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
नागरिकांच्या सोयीसाठी, विकासकामासाठी, घरकुल योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. शहरातील सर्व गटारी भूमिगत गटारी करण्यासाठी नियोजन तयार केलेले आहे. यापुढील काळात देवळाली प्रवरा शहरात उघड्यावरील गटार दिसणार नसल्याचे कदम यांनी सांगितले.