शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोकमठाण गावात ‘डेंग्यू’ने शाळकरी मुलीसह दोघांचा बळी

By admin | Updated: August 11, 2016 01:12 IST

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. फरीना अश्पाक सय्यद व गोरक्षनाथ काशिनाथ लोहकणे अशी मयतांची नावे आहेत. कोकमठाण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी व प्रचंड अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होवून ‘डेंग्यू’ सारख्या भयावह रोगाचा फैलाव झाला आहे. वारंवार ताप येणे, हात-पाय दुखणे, सांधे दुखणे, थकवा येणे आदी लक्षणे नागरिकांमध्ये आढळून येत आहेत.दरम्यान ‘डेंग्यू’ची लागण झालेल्या फरीना अश्पाक सय्यद (वय ७) या शाळकरी विद्यार्थिनीचा रविवारी मृत्यू झाला. तर गोरक्षनाथ काशिनाथ लोहकणे (वय २८) या शेतकऱ्याचा मंगळवारी उपचार चालू असताना मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी बुधवारी सकाळी कोकमठाणला भेट देत रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. आरोग्य तपासणीत अजय अण्णासाहेब धीवर (वय १६), गायत्री गोरख गायकवाड (वय २५), मनीषा विजय कांबळे (वय १५), नारायण माधव टेके (वय ७), विजय भगवानदास कांबळे (वय ४४), कालिदास पुंजा धीवर (वय ५३), कन्हैय्या रोहीदास संत (वय ७), जाकीर सरदार मन्सूरी (वय १८), रोहिणी सुभाष दुशींग (वय २७), सुनीता रामदास जाधव (वय ३५) व भाग्यश्री अशोक जाधव (वय १४) अशा ११ जणांना ‘डेंग्यू’ सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. संवत्सरचे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिकेत खोत, मलेरिया पर्यवेक्षक एन. बी. वळवी, विस्तार अधिकारी पी. जी. पाखरे, आरोग्य सहाय्यक टी. ई. माळी, जी. डी. चंदनशीव, आरोग्यसेवक एस. व्ही. महाजन, एस. एन. गांगुर्डे, जे. एस. आवारे, बी. डी. मलीक यांची आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.(प्रतिनिधी)आरोग्य विभागाची ५-६ पथके तयार करण्यात आली असून घरोघरी जावून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पाणीसाठे तपासून डासांची उत्पत्ती थांबविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गावात दोन वेळा औषध फवारणी केली जात आहे. ४गोदावरीला आलेल्या पुरानंतर शहरातील नदीकाठ, बेट, निवारा, गजानननगर, लिंबारा मैदान, इंदिरानगर, १०५ या परिसरात हिवताप, अतिसार, चिकनगुण्या या रोगांनी थैमान घातले आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरी आरोग्याची काळजी घेत आहोत.-सुनील देवकर, सभापती पंचायत समिती