पाथर्डी : नगर - पुणे मार्गावरील प्रवाश्यांची लूट करणारे अनाधिकृत बस थांबे बंद करण्याची मागणी मनसे परिवहन कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.परिवहन महामंडळाच्या बसेस थांब्यासाठी महामंडळाकडून अधिकृत परवाना आवश्यक असतो व त्या नियमांचे पालन होण्यासाठी तसेच प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी अधिकृत थांब्यावर बसेस थांबणे आवश्यक आहे. पण तसे न होता अनधिकृत हॉटेल्सवर सर्रास बसेस थांबतात. हा विषय अतिशय गंभीर असुन त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या १५ दिवसात अनधिकृत हॉटेल्स वरील थांबे बंद करावेत अन्यथा परिवहन कामगार सेना आपल्या कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी विभाग नियंत्रक विजय गीते यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर-पुणे महामार्गावरील अनधिकृत बस थांबे बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:38 IST