शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय स्वच्छतेचा ठेका रद्द करण्याची मागणी : श्रीरामपूर पालिकेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:17 IST

शहरात मोठ्या प्रमाणावर वैैयक्तिक शौचालये आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचा ठेका मागील ठेक्यापेक्षा अधिक दराने देण्याचे कारणच नाही.

श्रीरामपूर : शहरात मोठ्या प्रमाणावर वैैयक्तिक शौचालये आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचा ठेका मागील ठेक्यापेक्षा अधिक दराने देण्याचे कारणच नाही. तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली.पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड उपस्थित होते. प्रारंभी पुलवामा हल्ल्यतील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसहक्काने कर्मचारी भरतीचा विषय मागील सभेत स्थगित केला होता. या सभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय आल्याने विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला. मात्र, सभेत त्यास मंजुरी देण्यात आली.दैैनंदिन वसुली ठेक्याच्या निविदेवर निर्णय घेण्याचा अधिकार मुक्याधिकाऱ्यांना देण्यात आला. रामनवमी यात्रेत कमी खर्चात जागा देऊन त्याची वाढीव दरात विक्री केली जाते. त्यामुळे जागावाटपाच्या निविदा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरात सुरू असलेल्या काही रस्त्यांच्या व सार्वजनिक शौचालयांच्या विषयावरून मोठी खडाजंगी पहायला मिळाली. दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. नगरसेवक अंजूम शेख यांनी कारवाईची मागणी केली.या विषयावर श्रीनिवास बिहाणी यांनीही आवाज उठविला. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट आॅफ दी मंथ’ हा पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. आठवड्यातून दोनदा कोरडा दिवस पाळला जात असताना पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात केली. त्यामुळे काही लोकांना कमी पाणी मिळत असल्याची तक्रारही करण्यात आली. अवैैध नळजोड व पाण्याच्या टाक्यांतून वाया जाणाºया पाण्यावरही सभेत चर्चा झडली. त्यावर नगराध्यक्षा आदिक यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर