अहमदनगर : शहरातील धर्माधिकारी मळा येथे पुन्हा सुरु करण्यात आलेले फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सत्याग्रह केला. तर पंपिंग स्टेशन ते प्रेमदान चौक रस्त्याचे नामांतर कॅन्सर मोबाईल टॉवर मार्ग करण्यात आले.
अनधिकृत टॉवरकडे डोळेझाक करणाऱ्या व आर्थिक हित साधून परवानगी दिल्याचा आरोप करुन महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, वर्षा गवळी, माधवी दांगट, लता बोरा, प्रकाश हजारे, डॉ. अनिल बोरा, अभय मेहेत्रे, गोरक्षनाथ दांगट, ताराबाई तांबे, भाऊसाहेब वैद्य, वैष्णवी पवार, मिनल गोरे आदी सहभागी झाले होते.
मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरला विरोध दर्शवला आहे.