नगरकरांसाठी पुणे शहर अंगण ठरल्यास पुण्याच्या धर्तीवर शहराचा झपाट्याने विकास साधला जाणार आहे. नगर- पुणे लोकल रेल्वेसाठी संघटना आग्रही असून, ही नवीन वर्षाची भेट नगरकरांना पाठपुराव्याने मिळवून घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. नगर-पुणे लोकल रेल्वे सुरू झाल्यास नगरच्या उद्योगधंदे व व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शहरातील बेरोजगार युवकांना पुणे येथे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या चळवळीसाठी सुहास मुळे, नाना बोज्जा, अॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, उषा निमसे, अशोक भोसले, पोपट भोसले, सखूबाई बोरगे आदी प्रयत्नशील आहेत.
नगर- पुणे लोकल रेल्वेसेवेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST