घारगाव : राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील कोतवालांनी घारगावच्या आठवडे बाजारात ‘भिक मांगो’ असे अनोखे आंदोलन केले.गावोगावी असणा-या कोतवालांना सध्या केवळ मानधनावरच काम करावे लागत आहे. हे मिळत असलेले पाच हजार रुपये मानधन अतिशय कमी असल्याने या सर्व कोतवालांचा शासनाच्या चतुर्थ श्रेणीत समावेश करावा या मागणीसाठी नाशिक येथे छत्तीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर तालुक्यातील कोतवालांनी आज घारगाव येथे आठवडे बाजारात भिक मांगो आंदोलन केले.
संगमनेरमध्ये कोतवालांचे भिक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 15:49 IST