जामखेड : येथील निवारा बालगृहाच्या कार्यक्रमात व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या पराभवाचे खापर औरंगाबाद येथील काही वृत्तपत्र व त्यांच्या पत्रकारावर फोडून त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्याची लाखोळी वाहिली. या घटनेचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध करून तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना रविवारी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या प्रांगणात निवारा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते भास्करराव पेरे पाटील होते. त्यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाला ही बातमी सर्व मीडियाने प्रमुख बातमी केली. औरंगाबाद येथील वृत्तपत्रांनी पराभवाचे विश्लेषण काय पध्दतीने केले ते सांगताना पेरे हे पत्रकारांना हलकट, हरामखोर, बांडगूळ अशी विशेषने वापरली. एवढेच टोलनाक्यावर भिक्षा मागायला त्यांना ठेवले पाहिजे. यांना कोणी पत्रकार केले अशी मल्लिनाथी केली.
पराभव झाला की त्याचं खापर कोणाच्या तरी माथी फोडावं लागतं. आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे यांना निवडणुकीत गावच्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. त्याचा राग पत्रकारांवर काढला. या घटनेचा निषेध करुन पत्रकारांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी पत्रकार अशोक निमोणकर, नासीर पठाण, मैनुद्दीन तांबोळी, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे, अविनाश बोधले, समीर शेख, नंदूसिंग परदेशी, अजय अवचारे, अशोक वीर, धनराज पवार, रोहित राजगुरू, पप्पू सय्यद, फारुख शेख आदी उपस्थित होते.
..
फोटो-०२जामखेड निवदेन
....
ओळी-भास्करराव पेरे पाटील यांनी एका कार्यक्रमात पत्रकारांवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देताना पत्रकार.