शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या ठगाकडून महाराष्ट्रातील ५० जणांची फसवणूक; नगरच्या सायबर पोलिसांकडून अरोरा याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:37 IST

नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत आहेत.

अहमदनगर : नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत असून, नवी दिल्लीत एक कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हे गुन्हेगार लक्ष करत आहेत.नगर शहरातील बुरुडगाव रोड येथे राहणारा रोहित राजेंद्र गुंदेचा या तरुणाची नोकरीचे आमिष दाखवून २३ आॅक्टोबर २०१७ रोजी हिमांशू अरोरा आणि त्याचे साथीदार दसविंदर सिंग व विपुल नावाच्या व्यक्तीने ६८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली़ या प्रकरणी गुंदेचा याने २ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तीन दिवसांत नवी दिल्ली येथून हिमांशी अरोरा याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, नोकरीचे आमिष दाखवून त्याने महाराष्ट्रातीलच ५० जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे सांगितले़ न्यायालयाने आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नगरचे सायबर पोलीस या रॅकेटमधील इतर सात आरोपींच्या शोधात आहेत.

श्रीरामपूरच्या तरुणालाही २५ हजारांचा गंडा

हिमांशी अरोरा व त्याच्या साथीदारांनी श्रीरामपूर येथील विवेक कचेश्वर जठार (वय २२) या तरुणालाही नोकरीचे आमिष दाखवून आॅनलाइन पद्धतीने त्याच्या बँक खात्यातील २५ हजार रुपये काढून घेतले़ याबाबत जठार याने सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली आहे.

नोकरी डॉटकॉमवरून तरुणांची माहिती

नोकरीच्या शोधात असलेले बहुतांशी सुशिक्षित तरुण ‘नोकरी डॉटकॉम’ या वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती भरून बायोडाटा अ‍ॅपलोड करतात. हिमांशी अरोरा व त्याच्या साथीदारांनी नोकरी डॉटकॉमवरूनच तरुणांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करतात. नोकरी डॉटकॉम पेल्समेंटमधून बोलत असल्याचे सांगत नोकरी हवी आहे का, अशी विचारणा केली जाते. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी म्हणून १०० रुपये भरण्यास सांगितले जाते. यावेळी संबंधिताकडून बँकेचा ओटीपी घेऊन त्याच्या खात्यातील रक्कम आरोपीच्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतात.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस