शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या तरुणाला फसविणारा दिल्लीतला ठग गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:35 IST

नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे.

अहमदनगर : नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे.शहरातील बुरुडगाव रोड परिसरात राहणारा रोहित राजेंद्र गुंदेचा (वय ३३) याला २३ आॅक्टोबर २०१७ रोजी एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने जॉब हवा आहे का, अशी विचारणा केली. रोहित याने संमती दर्शविताच सदर व्यक्तीने एका वेबसाईटचे नाव सांगून त्यावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी भरण्यास सांगितले. तसेच १०० रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरण्यासाठी याच वेबसाईटवर असलेले पेमेंट आॅप्शनमधून आॅनलाइनवर जाण्यास सांगितले़ पैसे भरण्याच्या आॅप्शनमध्ये फिर्यादीस आलेला ओटीपी भरण्यास सांगितले. त्यानंतर रोहित याला आलेला व्हेरिफिकेशन कोड त्या व्यक्तीने विचारून घेतला. त्यानंतर लगेच रोहित याच्या बँक खात्यातून सदर व्यक्तीने ६८ हजार ५०० रुपये काढून घेतले़ याबाबत रोहित याने २ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला, तेव्हा रोहित याला दिल्ली येथून हिमांशू अरोरा यानेच फोन केल्याचे समोर आले. सायबर पोलीस पथकाने दिल्ली येथे जाऊन अरोरा याला ताब्यात घेतले. निरीक्षक सुनील पवार यांच्यासह उपनिरीक्षक पी. डी. कोळी, कॉन्स्टेबल राहुल गुंडू, अरुण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड, भगवान कोडार, सम्राट गायकवाड, नेहा तावरे व सीमा भांबरे, पूजा भांगरे यांनी ही कारवाई केली.

दोन साथीदारांच्या मदतीने फसवणूक

अरोरा याने त्याचे दिल्ली येथील साथीदार दसविंदरसिंग व विपुल यांच्या मदतीने रोहित याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सीमकार्ड जप्त केले आहे. न्यायालयाने आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ या आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

आॅनलाइन फ्रॉडचे दिल्ली रॅकेट

नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बहुतांशी जणांची आॅनलाइन फसवणूक झालेली असून, अशा पद्धतीने फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार हे दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यांतील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खोट्या फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcyber crimeसायबर क्राइमahmednagar policeअहमदनगर पोलीस