शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्टपूर्तीसाठी वाळूलिलाव, महसूल प्रशासनाची न्यायालयात कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 15:11 IST

मार्चएण्डमुळे ‘महसूल’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी तातडीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून वाळूलिलाव प्रक्रिया राबविली आहे. तसेच वाळूठेक्याचा लिलाव झाल्यानंतर पर्यावरण समितीची मान्यता घेतली असल्याची कबुली प्रशासनाने न्यायालयात दिली आहे. 

अहमदनगर : मार्चएण्डमुळे ‘महसूल’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी तातडीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून वाळूलिलाव प्रक्रिया राबविली आहे. तसेच वाळूठेक्याचा लिलाव झाल्यानंतर पर्यावरण समितीची मान्यता घेतली असल्याची कबुली प्रशासनाने न्यायालयात दिली आहे.  वाळू लिलाव प्रक्रियेतील ही अनियमितता ‘लोकमत’ने प्रथम उघडकीस आणली होती.जिल्ह्यातील वाळूतस्करीबाबत दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात बुधवारी महसूल प्रशासनाच्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर करण्यात आले. याबाबत पुढील सुनावणी २५ जून रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मोदी यांच्यासमोर होणार आहे. वाळूलिलावासाठी नियमबाह्य पद्धतीने निविदा काढून वाळूतस्करीला साथ दिली या कारणावरून अ‍ॅड. श्याम आसावा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व शेतकरी संपत जाधव यांनी ‘प्रातिनिधिक दावा’ दाखल केला आहे. यामध्ये महसूल सचिव, जिल्हाधिकाऱ्यांसह ९ अधिकारी व चार वाळू ठेकेदारांना प्रतिवादी करण्यात आले आहे.बातम्या आल्यानंतर वाळूठेक्यांची तपासणीयाबाबत महसूल प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की देशातील रेती धोरणाबाबत याचिका दाखल झाल्यानंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वाळूलिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. राज्यस्तरावर प्रकाशित होणा-या वृत्तपत्रात जाहिरात देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आहे़ मात्र असे बंधन नाही़ महसूलची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात १६ मार्च २०१८ रोजी जाहिरात प्रकाशित केली होती. त्यानंतर पर्यावरण व वाळूलिलाव मान्यता समितीकडून १८ मार्च व २० मार्च २०१८ रोजी मान्यता घेण्यात आली.  कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळूउपशाबाबत ठेकेदाराला १९ मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत ठेकेदाराने उत्तर दिलेले आहे़ सध्या तेथील वाळूचे उत्खनन थांबविण्यात आले आहे. याबाबत मात्र अद्यापपर्यंत पुढील निर्णय झालेला नाही. वाळूउपशाबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना वाळूठेक्याची तपासणी करण्याचे आदेश दिल्याचे अहवालात म्हटले आहे.टपाल खात्याची दिरंगाईवाळूतस्करीबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात ९ महसूल अधिका-यांसह ४ वाळू ठेकेदारांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.  याबाबत नाशिक व सिन्नर येथील वाळू ठेकेदारांना ५ जून रोजी स्पीड पोस्टच्या माध्यमातून न्यायालयाचे समन्स पाठविले होते. या स्पीड पोस्टचा मात्र अद्यापपर्यंत अहवाल प्राप्त झालेला नाही. याबाबत याचिकाकर्ते अ‍ॅड. श्याम आसावा यांनी टपाल विभागाला पत्र पाठवून खुलासा मागितला आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय