शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दीपक पेट्रोल पंपावर अरेरावी : उपअधीक्षकांना धक्काबुक्की : ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:39 IST

सावेडीतील दीपक पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्याच्या वादातूून उपअधीक्षक संदीप मिटके व अन्य एका पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

अहमदनगर : सावेडीतील दीपक पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्याच्या वादातूून उपअधीक्षक संदीप मिटके व अन्य एका पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. याप्रकरणी एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक केली आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गणेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण व उपअधीक्षक मिटके हे बुधवारी (दि. १) रात्री साडेदहाच्या सुमारास खासगी कामानिमित्त दुचाकीवर (एमएच २६ बीएफ १५९०) प्रोफेसर चौकात गेले होते. तेथून परत पोलीस मुख्यालयाकडे जात असताना झोपडी कॅन्टीनलगच्या दीपक पेट्रोलपंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले. १०० रूपयांचे पेट्रोल टाकल्यानंतर चव्हाण यांनी आणखी १०० रूपयांचे पेट्रोल टाकण्यास पंप कर्मचाºयाला सांगितले. परंतु त्या कर्मचाºयाने मीटरवर आधीचाच आकडा दाखवून पेट्रोल टाकल्याचे भासवले. चव्हाण यांनी त्यास याचा जाब विचारला असता, कर्मचाºयाने अरेरावीची भाषा वापरली. त्यावर चव्हाण यांनी पंपाच्या मॅनेजरला हा प्रकार सांगितला, परंतु मॅनेजरनेही आमच्याकडे असे प्रकार होत नसल्याचे सांगितले. त्यावर चव्हाण यांनी आम्हाला दुचाकीच्या टाकीतील पेट्रोल मोजून द्या, असे सांगताच पंपावरील सर्वच कर्मचारी जमा झाले व त्यांनी चव्हाण यांच्याशी अरेरावी केली. त्यावेळी उपअधीक्षक मिटके यांनी त्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही अरेरावी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.हा प्रकार पाहून तेथे नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, पेट्रोलिंगकरिता असलेले पोलीस तेथे आले. पोलीस आल्याचे पाहून कर्मचारी पळून गेले. परंतु त्यावेळी पेट्रोल भरणारा कर्मचारी आकाश चंद्रकांत आल्हाट (वय २६, सिद्धार्थनगर) व मॅनेजर गोरख लक्ष्मण ठाकूर (वय २६, भिंगार) यांना मात्र पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे इतरांची नावे विचारली असता, सचिन थोरात, किरण नेटके, अक्षरा सावळे, प्रकाश कनोजिया, शाहरूख पठाण, आॅगस्टिन जी, आकाश बीडकर, बॉबी साळवे, असाद अशी नावे समजली. या सर्वांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर