शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दहा टक्क्यांनी ऊस गाळप घटणार

By admin | Updated: January 31, 2016 23:31 IST

अहमदनगर : तीन महिन्यांत नगर जिल्ह्यात जानेवारीअखेर ६२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून मार्चअखेर गाळप हंगाम सुरू राहणार

अहमदनगर : तीन महिन्यांत नगर जिल्ह्यात जानेवारीअखेर ६२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून मार्चअखेर गाळप हंगाम सुरू राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ६५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले असून गाळप आणि साखर उत्पादनात अंबालिका साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी १ कोटी २० लाख मेट्रीक टन गाळप झाले होते. यंदा त्यात दहा टक्के घट येणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याचा विषय गाजत आहे. साईकृपा क्रमांक २ हा कारखाना एफआरपीमुळे सुरू होवू शकलेला नाही. काही कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्यानंतर त्यांची एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी धावपळ झाली होती. एकीकडे उसाची टंचाई आणि त्यातून सुरू असलेली उसाची पळवापळवी, त्यात साखरेच्या भावाचा प्रश्न अशा दृष्टचक्रातून साखर कारखानदारी मार्गस्थ होताना दिसत आहे. गंगामाई कारखाना वगळता सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा दहाच्या पुढे निघालेला आहे. सर्वाधिक साखर उतारा मिळविण्यातही अंबालिका आघाडीवर असून या कारखान्याचा साखर उतारा ११.३९ टक्के निघालेला आहे. उसाचा प्रश्न आणि साखरेचा भाव यामुळे नगर तालुका साखर कारखाना (पियुष) सुरू होवून महिनाभरात बंद पडला आहे. पाच लाखाच्या पुढे गाळप करण्यात ज्ञानेश्वर कारखान्याचा समावेश आहे. विखे आणि थोरात कारखाना ४ लाखाच्या टप्प्यात आहेत. गेल्या वर्षी १ कोटी २० लाख मेट्रीक टन गाळप झाले होते. यंदा त्यात दहा टक्के घट येणार असल्याचा अंदाज आहे. एप्रिल ते जून २०१५ या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चारा म्हणून उसाचा वापर केल्याने यंदा साधारण दहा लाख मेट्रीक टन गाळप कमी होणार आहे. (प्रतिनिधी)