शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा महागोंधळ : राष्ट्रीय बँकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:59 IST

कर्जमाफीचे अर्ज किती जणांनी भरले? माहीत नाही. किती जण पात्र ठरले? माहीत नाही. किती जण अपात्र ठरले? माहीत नाही. किती कुटुंब पात्र ठरली? माहीत नाही.

मिलिंदकुमार साळवे , अण्णा नवथर अहमदनगर : कर्जमाफीचे अर्ज किती जणांनी भरले? माहीत नाही. किती जण पात्र ठरले? माहीत नाही. किती जण अपात्र ठरले? माहीत नाही. किती कुटुंब पात्र ठरली? माहीत नाही. प्रति व्यक्ती किती जणांना कर्जमाफीचा लाभ मिळाला? माहीत नाही. वर्षपूर्ती केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन कामकाज राज्य सरकारच्या ‘महाआॅनलाइन’अंतर्गत सुरू असून यात सध्या हा महागोंधळ सुरू आहे.महागोंधळामुळे योजनेचे समन्वयन करणाऱ्या सहकार विभागाला ना पालकमंत्र्यांना या योजनेची ठोस आकडेवारी सांगता येते. ना जिल्हाधिका-यांना. २८ जून २०१७ ला कर्जमाफीचा शासन आदेश निघून प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास २०१७ चा आॅक्टोबर उजाडला. कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्र वाटपास पुढील महिन्यात दिवाळीत एक वर्ष होईल. वर्षभरानंतरही पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांकडे किती शेतकºयांना किती रूपयांची कर्जमाफी झाली? याची माहिती उपलब्ध नाही.२४ जुलै २०१७ ते २२ सप्टेंबर २०१७ अखेर जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ९२० कर्जमाफी अर्ज अपलोड झाले. ६ आॅक्टोबरअखेर जिल्हा बँकेमार्फत २ लाख ५५ हजार ८२५ लाभार्र्थींना ९१७ कोटी ९४ लाख रूपयांची कर्जमाफी झाली आहे. यात व्यापारी बँकांमार्फत ३७ हजार ६१ लाभार्र्थींना २५७ कोटी २१ लाखांची कर्जमाफी दिली. पण व्यापारी बँकांची ही आकडेवारी ३१ मार्च २०१८ अखेरचीच आहे. या बँकांनी नंतरची आकडेवारीच सहकार विभागास दिलेली नाही.राष्टÑीय बँकांकडून जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना कर्जमाफीची माहिती सतत मागूनही मिळत नाही. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बँकर्स समितीचे या बँकांवर व प्रक्रियेवर कडक नियंत्रण नाही. त्यामुळे या बँकांचे व्यवस्थापक राज्याच्या अधिकाºयांना जुमानत नाहीत. त्यामुळे ३१ मार्च २०१८ नंतरची या बँकांची कर्जमाफीची माहितीच सहकार खात्यास मिळालेली नाही.

जिल्हा बँकेची आकडेवारी आम्हाला नियमित व अचूकपणे मिळते. पण इतर राष्टÑीयीकृत, व्यापारी बँकांची माहिती मिळत नाही. २२ सप्टेंबर २०१७ अखेर पर्यंतचीच आॅनलाइन अपलोड केलेली माहिती सहकार विभागाकडे आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून अपलोड झालेल्या अर्जांची माहिती महाआॅनलाइनकडे आहे. अपलोड,पात्र, अपात्र अशी माहिती जिल्हास्तरावर उपलब्ध नाही. महाआॅनलाइनला पत्र देऊन त्यांच्याकडून माहिती मागविली आहे. - दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर