शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन’ : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 15:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर ...

ठळक मुद्देबुलेट ट्रेनचा महाराष्ट्रावर विनाकारण बोजाया प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. नंतर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला.शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर त्या खर्चाचा बोजा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करायला हवा होता. शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही’, असा टोमणा मारत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत राज्य, तसेच केंद्र शासनावर टीका केली.कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त नगरला आले असता, पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शासनावर नेम धरला. मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेन सुरू करण्यास विरोध नाही. परंतु या बुलेट ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्रालाही काहीच फायदा नाही. या प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत. अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन आहेत, त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. उर्वरित स्टेशन गुजरातच्या हद्दीत असल्याने त्याचा जास्त लाभ गुजरातलाच आहे. महाराष्ट्रावर याचा विनाकारण बोजा पडतो आहे, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी करायला हवा होता. बुलेट ट्रेन करायचीच होती तर ती मुंबई-दिल्ली अशी करायची होती. मग त्याचा बºयाच राज्यांना फायदा झाला असता. महाराष्ट्रात करायची होती तर चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी करायची, मग त्याचा राज्याला लाभ झाला असता, असे मुद्दे अधोरेखित करत शरद पवार यांनी बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. हळूहळू त्यात बदल होत गेले, नंतर तर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला. त्यामुळे शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही. आता पाहू कधी जेवायला मिळतंय ते, असा टोमणा पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला मारला.शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही, त्यासाठी आधी बाहेर पडा, मग आमच्यासारखे रस्त्यावर या, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेलाही पट्ट्यात घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अंकुश काकडे, आ. अरूण जगताप, संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.