शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर..!
2
आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट
3
पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा बार फुसका कसा निघाला? उत्तर देताना चिनी संरक्षण प्रवक्त्यांची उडाली फे फे
4
३५०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाचा मोठा खुलासा
5
"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा
6
मराठी मुलासोबत अमरीश पुरींच्या लेकीने केलंय लग्न, अभिनय क्षेत्रापासून दूर राहून करते हे काम
7
खळबळजनक! दातावर उपचार करणं पडलं महागात; सलाईनच्या १ बॉटलने घेतला ८ जणांचा जीव
8
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
9
"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट
10
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
11
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."
13
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
14
"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया
15
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
16
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
17
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
18
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
19
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी

बाळंतपणात महिलेचा मृत्यू

By admin | Updated: July 7, 2014 23:37 IST

अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला.

अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला. त्यामुळे तब्बल बारा तास ताटकळलेल्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. अखेर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तो मृतदेह पुणे येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र या प्रकाराने पोलीस आणि जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.अश्विनी दत्तात्रय इजारे (मूळ रा. सोलापूर, पाथर्डीला माहेर)ही महिला बाळंतपणासाठी दोन-तीन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. रविवारी रात्री ती बाळंत झाली आणि तिला मुलगा झाला. मात्र बाळंतपणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. रक्तस्त्राव झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. परंतु डॉक्टरांच्या संपामुळे मृतदेह बराचवेळ ताटकळत पडला. बाळंतपणात मृत्यू झालेल्या महिलेचे शवविच्छेदन पुणे किंवा औरंगाबाद येथे करण्यात येते. जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासन यांची कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर पाठविला जातो. नेमक्या या प्रक्रियेची माहिती मयताच्या नातेवाईकांना दिली गेली नसल्याने ते संतप्त झाले. रात्रभर मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅम्ब्युलन्समध्येच ठेवल्याने नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाशीही संपर्क साधला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोलीस अधिकाऱ्याच्या सहीसाठी मृतदेह ताटकळत पडला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि पोलीस व डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह पुणे येथे पाठविण्यात आला. महिलेला झालेले बाळ सुरक्षित असून त्याला महिलेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. (प्रतिनिधी)