शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी येथे चोरट्यांच्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:30 IST

अष्टवाडा उपनगरात राहणा-या दुर्गा कोष्टी (वय ६०) यांचा रात्री चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मात्र, घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे सांगत पोलिसांनी कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पाथर्डी : शहरातील अष्टवाडा उपनगरात राहणा-या दुर्गा कोष्टी (वय ६०) यांचा रात्री चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मात्र, घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे सांगत पोलिसांनी कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.मयत दुर्गा कोष्टी या अष्टवाडा येथील त्यांच्या घरी पती ओमकार उर्फ बाळासाहेब कोष्टी यांच्यासह राहत असून रात्री अज्ञात मारेक-यांनी दुर्गा कोष्टी यांच्या डोक्यात टणक शस्त्राने घाव घालून त्यांचा खून केला आहे. मयत दुर्गा यांच्या गळ्यावर ओरखडल्याचे निशाण असून चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केल्याचे सांगण्यात येते. परंतु मयत दुर्गा कोष्टी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, कानातील सोन्याचे दागिने पायातील चेन आदी वस्तूंची चोरी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनाही कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय आहे. पोलीस पथकाने श्वानामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु श्वान घरातच घुटमळल्याने मयताच्या मृत्यूबाबत संशय गडद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, मध्यरात्री १.३८ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची कोष्टी यांच्या घराजवळ संशयास्पद हालचाल सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत दुर्गा यांचे पती बाळासाहेब हे पतसंस्थेत कलेक्शनचे काम करतात. दोघेही अष्टवाडा येथे राहत होते. मयत दुर्गा यांचे दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी