कोपरगाव : शाळकरी विद्यार्थ्याला हिंगणी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून जलसमाधी मिळाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी धारणगाव येथील सौरभ बाबासाहेब चौधरी (वय १६) हा शाळकरी विद्यार्थी हिंगणी बंधाऱ्यावर गेला होता. पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला. पोहत असताना अचानक पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. काही तरूणांनी हा प्रकार पाहिल्यावर थेट बंधाऱ्यात उड्या घेऊन सौरभचा मृतदेह बाहेर काढला. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.(प्रतिनिधी)
हिंगणी बंधाऱ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: October 20, 2016 01:33 IST