शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पांगरमल दारूकांडातील आरोपी मोहन दुग्गल याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:54 IST

नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल (वय ६४) यांचा शनिवारी नाशिक येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुग्गल हा नाशिक येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

अहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल (वय ६४) यांचा शनिवारी नाशिक येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुग्गल हा नाशिक येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

तब्बल अकरा जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल दारूकांड प्रकरणात १९ जणांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे. या प्रकरणी नाशिक येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, याची सुनावणी सुरू आहे. पांगरमल येथे १२ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांसाठी राजकीय नेत्यांनी दिलेल्या पार्टीत विषारी दारू पिऊन अकरा जणांचा मृत्यू झाला होता. ही विषारी दारू नगर शहरातील जिल्हा रूग्णालयातील कॅन्टीनमध्ये बनविण्यात येत होती़ या प्रकरणी पोलीसांनी बनावट दारू बनविणा-या मोहन दुग्गलसह, जाकीर शेख, जितू गंभीर, सोनू दुग्गल, हमीद शेख, भरत जोशी यांना अटक केली होती. मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर बनावट दारू बनविणाºयांचे रॅकेट समोर येऊन या प्रकरणात तब्बल १९ जणांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील आरोपींवर मोक्कातंर्गतकारवाई झाल्यानंतर त्यांना नाशिक कारागृहात हलविण्यात आले. मोहन दुग्गल हा गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता. तो अजारी पडल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. शुक्रवारी रात्री त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला नाशिक येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेतील दोघांचा मृत्यूपांगरमल दांरूकांड प्रकरणातील आरोपी राजू बुगे याचा २२ मार्च २०१७ रोजी ओतूरजवळील (जि़ पुणे) सुंबरवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेतील १९ पैकी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर