शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जिल्हा कारागृहातील आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:40 IST

फसवणुकीच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा गुरूवारी मृत्यू झाला

अहमदनगर: फसवणुकीच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा गुरूवारी मृत्यू झाला. परंतु पोलिसांमधील हद्दीचा वाद, प्रशासनाची ढिलाई यामुळे मृतदेहाचा पंचनामा होण्यासाठी तब्बल १० तास लागले. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.सोमनाथ आसाराम ठोंबे (वय ३३, रा. कौडगाव, ता. नगर) असे मृताचे नाव आहे. ठोंबे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने तो गेल्या दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा कारागृहात दाखल झाला होता. गुरूवारी सकाळी अचानक त्याच्या छातीत दुखायला लागल्यामुळे कारागृह पोलिसांनी त्याला सकाळी साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. जिल्हा कारागृह कोतवाली पोलिसांच्या हद्दीत व जिल्हा रूग्णालय तोफखाना पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे या मृत्यूप्रकरणी गुन्हा कोठे दाखल करायचा यावर पोलिसांचे मंथन सुरू झाले. कारागृहात असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने पुढील कायदेशीर क्लिष्टतेचे झेंगट नको त्यामुळे पोलीस हात झटकत होते, तर दुसरीकडे पंचनामा होत नसल्याने नातेवाईट ताटकळत बसले. अखेर सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोतवालीकडे चौकशी केली असता दुपारी ३.५६ वाजता नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुसरीकडे तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनाम्याची प्रक्रिया रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत सुरू होती. कारागृहात असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन कोठे होणार याबाबत नगरचे तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांच्याकडे रात्री पावणेनऊ वाजता विचारणा केली असता, पंचनामा सुरू असून पुढील निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे सकाळी अकरा वाजता झालेल्या मृत्यूचा पंचनामा रात्री नऊवाजेपर्यंत सुरू होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर