दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 16:16 IST
राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारात शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यांनी केलेल्या हल्ल्यात देऊबाई शिवाजी खिलारी (वय ५५) ही महिला ठार झाली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार
राहाता /अस्तगाव : राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारात शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यांनी केलेल्या हल्ल्यात देऊबाई शिवाजी खिलारी (वय ५५) ही महिला ठार झाली. चार जण गंभीर जखमी झाले.सात ते आठ दरोडेखोरांनी नळे वस्ती,खिलारी वस्ती,तांदळे वस्ती, देसाई वस्ती येथे धुमाकूळ घातला. खिलारी वस्तीवर घराबाहेर झोपलेल्या देऊबाई खिलारी यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या कानातील सोन्याची टापसे ओरबाडली. त्यांनी प्रतिकार केल्यामुळे दरोडेखोरांची झटापट झाली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात देऊबाई या ठार झाल्या. त्यानंतर तांदळे, देसाई वस्ती येथील घरांची उचकापाचक करीत घरातील मोबाईल हिसकावून नेले. तेथून त्यांनी आपला मोर्चा नळे वस्तीवर नेला. या ठिकाणी महिलांच्या अंगावरचे दागिने हिसकावून घेतले. नळे वस्तीवरील मारुती काशिनाथ नळे (वय ६०), नंदा मारुती नळे (वय ५०), संतोष मारुती नळे (वय ३२), सोनाली संतोष नळे (वय २८) या एकाच कुटुंबातील चौघांना कुºहाड, लाडकी दांडा व लोखंडी फुकणीने जबर मारहाण केली. नंतर दुसºया नळे वस्तीवर गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरडा केल्याने दरोडेखोर पळून गेले. आसपासच्या लोकांनी जखमींना शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी व लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालसात दाखल केले. मात्र सकाळी आठ वाजता दरोडेखोºयांच्या मारहाणीत देऊबाई खिलारी मयत झाल्याचे उघड झाले.घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, राहात्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्यासह शिर्डी, राहाता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी सभा घेत घटनेचा निषेध करीत अस्तगाव बंद पाळला. दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी घटनास्थळी व खिलारी कुटुंबास भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस अधिकाºयांशी चर्चा केली.