शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे डांबरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 12:28 IST

गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना.

ठळक मुद्देरस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला.एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे.एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत.

अहमदनगर : गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना. तीन दिवसांत डांबरीकरणास सुरूवात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दरेवाडी-उक्कडगाव-मांडवा या रस्त्याचे काम रखडले होते. चालू आर्थिक वर्षात या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे. एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत. खडीकरणाचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण झाले. पुढे पावसाचे दिवस सुरू झाल्याने डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाचे चार महिने उलटून गेले आहेत. पाऊस थांबून महिना झाला, तरी डांबरीकरणाचे काम करण्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार डोळेझाक करीत आहेत.कधी नव्हे तो गेल्या बारा वर्षांतून एकदा या रस्त्याला मुहूर्त लागला. खडीकरणानंतर डांबरीकरणही पूर्ण होऊन या रस्त्याचा एकादाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा होती. परंतु डांबरीकरण रखडल्याने या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येत्या तीन दिवसांत डांबरीकरणाचे काम झाले नाही, तर जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नारायणडोहो, उक्कडगाव, तसेच मांडवे येथील नागरिकांनी दिला आहे.

अधिका-यांचे आश्वासन हवेत

या रस्याचे डांबरीकरण आॅक्टोबरअखेर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. परंतु महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याने त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. गुरूवारी पुन्हा कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग