शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

टंचाईचे संकट : २० दिवसांचा साठा शिल्लक

By admin | Updated: April 7, 2017 14:55 IST

शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो.

कोपरगाव : कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन दरवर्षी कोलमडते. शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यातच तब्बल ५१ टक्के पाण्याची तूट होत असल्याने यंदाच्या कडक उन्हाळ्यात कोपरगावकरांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ७० हजारावर आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी नगरपालिकेने एकूण ८.२० दलघफू क्षमतेचे ४ साठवण तलाव बांधले आहेत. मात्र त्यात सध्या २३ कोटी २० लाख लिटर इतके पाणी शिल्लक आहे. प्रती माणसी १०० लिटर पाणी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार शहराला दररोज ११ लाख २५ हजार लिटर पाणी लागते. परंतु बाष्पीभवन, वहनातील तूट, गाळाने तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तर तब्बल ५१ टक्के पाणी गळतीत वाया जाते. सध्या शहराला ६ दिवसाआड केवळ ४५ मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. शिल्लक पाणी साठा किमान २० दिवस पुरेल इतका आहे. पाणी योजनांवरील २ जलशुध्दीकरण केंद्रे चालू असून नवीन ४२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच तेही कार्यान्वित होईल. गोदावरी कालव्यांना पाणी आल्यास ४ दिवसाआड पाणी पुरवठा करता येतो. मागील वर्षी उन्हाळ्यात २१ दिवसाआड पाणी पुरवठा केला गेला. पालिकेवर तीच नामुष्की पुन्हा ओढावण्याची भीती आहे.शहर हद्दीबाहेर २५ लाख लिटर पाणी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना ३ लाख लिटर पाणी दिले जाते. तर शहर हद्दीबाहेर शिवारातील ओम नगर, शंकर नगर, कर्मवीर नगर, द्वारका नगर व गवारे नगर तसेच जेऊर पाटोदा व कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत २५ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. १५ मेपर्यंत शिल्लक पाणी साठा पुरणार नगरपालिकेने उपलब्ध पाणी साठ्यांचा विचार करता ४ दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास २ मे, ५ दिवसाआड केल्यास ९ मे व ६ दिवसाआड केल्यास १५ मेपर्यंत शिल्लक साठा उपयोगात आणता येईल. पाटबंधारे खात्याने गोदावरी नदीला १९ मे रोजी आवर्तन सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १५ ते १९ मे दरम्यान ४ दिवस निर्जळी राहणार आहे.