शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसह विरोधी नगरसेविकांची दांडी

By admin | Updated: July 11, 2016 23:49 IST

अहमदनगर : महापौर सुरेखा कदम यांनी बोलविलेल्या बैठकीला भाजपसह विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी दांडी मारली.

अहमदनगर : महिला नगरसेविकांच्या प्रभागातील अडचणी जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी बोलविलेल्या बैठकीला भाजपसह विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी दांडी मारली. ३५ पैकी फक्त ९ नगरसेविका (महापौरांसह) हजर होत्या. दैनंदिन साफसफाई, पुरेसे पाणी आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची माफक अपेक्षा महिला नगरसेविकांनी व्यक्त केली.महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला नगरसेविकांची बैठक आयोजित करण्याची घोषणा केली होती. महिला नगरसेविकांच्या प्रभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर विशेष लक्ष देवून उपाययोजना आखणे असा बैठकीचा उद्देश होता. त्यादृष्टीने कदम यांनी सोमवारी (दि.११) सायंकाळी पाच वाजता ही बैठक बोलविली होती. महापौर कार्यालयातून सर्वच नगरसेविकांना निरोप देण्यात आले. मात्र, या बैठकीसाठी केवळ आठच नगरसेविका उपस्थित होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या शारदा ढवण, छाया तिवारी, दिपाली बारस्कर, प्रतिभा भांगरे, सुनीता फुलसौंदर, राष्ट्रवादीच्या सभापती नसीम शेख, अपक्ष नगरसेविका सारिका भुतकर, उषा ठाणगे यांचा समावेश होता. शिवसेनेच्याच उर्वरित नगरसेविका यांनी कौटुंबिक कारणामुळे येणार नसल्याचे कळविले होते. भाजपच्या एकही महिला नगरसेविका बैठकीला नव्हत्या. विरोधी पक्षाच्याही नगरसेविकांना निरोप दिले होते, मात्र त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)