शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धरण दुस-यांदा ओव्हरफ्लो ; ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:37 IST

धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्हयाची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडून बुधवारी सकाळी ४ हजार क्युसेक्सने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले.धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. ११ दरवाजे प्रत्येकी चार इंच उंच करून पाण्याला वाट करून देण्यात आली.२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरले़ कोतूळ येथे १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ नदी पात्रात पाणी सोडण्यापूर्वी मुळा नदी काठी असलेल्या ग्रामपंचयाती,राहुरी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय यांना पाटबंधारे खात्याने कळविले. मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. यावेळी धरण शाखा अभियंता शामराव बुधवंत, सतीश जाधव,संदीप शिंगाडे, गुलाब शेख, दिलीप कुलकर्णी, दत्तू पवार, बबन शिंदे, सलीम शेख आदी उपस्थित होते.बुधवारी दिवसभर लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर पावसाची रिमझिम सुरू होती़ परतीचा पाऊस असल्याने शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही़ मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.या पावसाळ्यात मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर २१ सप्टेंबरला मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. गेल्या आठवड्यात आवक घटल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता़ बुधवार ११ आॅक्टोबरला धरण दुस-यांदा ओव्हरफ्लो होऊन त्यातून पाणी सोडण्यात आले. १९७१ पासून मुळा धरण २७ वेळा पूर्ण क्षमतेने भरले.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़ पाण्याची नव्याने आवक सुरू झाल्याने नदी पात्रात ४ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पातळी प्रत्येक तासाला तपासली जात आहे़ अधुनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत़ २६ हजार द.ल.घ.फू. पाण्याचा साठा कायम ठेऊन आलेले पाणी नदी पात्रात सोडले जात आहे़ पावसाची शक्यता लक्षात घेता नदी कठावरील गावक-यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.-शामराव बुधवंत मुळा धरण अभियंता, राहुरी.