शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डागवाले यांचा सेनेला जय महाराष्ट्र!

By admin | Updated: July 27, 2016 00:44 IST

अहमदनगर : सात महिन्यांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक किशोर डागवाले यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला आहे.

अहमदनगर : सात महिन्यांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक किशोर डागवाले यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत डागवाले यांना बाजूला टाकून निर्णय घेतले होते. सहा महिन्यांमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख पद देण्याचे वचन सेनेने पाळले नसल्याने नाराज होत शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय डागवाले यांनी घेतला आहे. अडीच वर्षे कुठेही न जाता फक्त काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.शहराच्या मध्यभागातील परिसराचे अनेक वर्षांपासून डागवाले नेतृत्त्व करीत आहेत. शिवसेना-महानगर विकास आघाडी-मनसे-शिवसेना असा त्यांनी प्रवास केला आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला डागवाले यांची नेहमीच मदत झाली असल्याने त्यांचे महापालिकेच्या सत्ताकारणात आतापर्यंत महत्त्व राहिले आहे. मनसेमध्ये फारसे स्वारस्य न राहिल्याने आणि संघटनात्मक पातळीवर त्यांचे सूत न जमल्याने त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना महापालिका निवडणुकीत पराभूत करून डागवाले यांनी शहरात इतिहास घडविला होता. तेव्हापासून राठोड-डागवाले यांचे वितुष्ट जास्तच वाढले होते. अनिल राठोड यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सेना बांधणीसाठी पुढाकार घेतला. शिवसेनेशी दुरावलेल्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून डागवाले यांना सेनेत आणण्यात कोरगावकर यांना यश मिळाले. त्याचवेळी सहा महिन्यांमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख पद देण्याचा त्यांना शब्द देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात डागवाले यांनी प्रभागामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्यासाठी त्यांनी माजी आमदार राठोड यांना निमंत्रणे दिली. मात्र, डागवाले यांच्या प्रत्येक कार्यक्रमाकडे पाठ फिरवून डागवाले शिवसेनेत नकोत, असाच राठोड यांनी अप्रत्यक्षपणे संदेश दिला. त्यामुळे डागवाले अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत डागवाले यांना दूर ठेवूनच सर्व रणनिती आखण्यात आली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांना शहर विकास आघाडीत नेले. महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याने तुमची साथ द्या, असे साकडेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डागवाले यांना घातले होते. त्यामुळे डागवाले शहर विकास आघाडीत गेले आणि त्यांची तिथेच फसगत झाली. सेनेच्या विरुद्ध गेल्याने डागवाले यांना सेनेच्या संघटनात्मक स्तरावर संधी देण्याबाबत राठोड यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाक मुरडले. त्यामुळे डागवाले यांचे शहरप्रमुख होण्याचे स्वप्न भंगले. (प्रतिनिधी)