बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील मराठवाड्याच्या सीमेवर असणा-या मुरमी या गावात रात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला.मुरमी येथील लहानू सीताराम गाडीवान (वय-६०) यांच्या घरी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांनी दरोडा टाकला. लहानू गाडीवान यांच्यावर तलवारीने त्यांच्या छातीवर वार केले. ४३ हजार रोख रक्कम, चार तोळे सोन्याचे दागिने, घरातील महत्वाची जमिनीचे घरांचे कागद पत्रे ठेवलेल्या एक लोखंडी पेटी पळवून नेली. दुसरी लोखंडी पेटी जवळच असलेल्या शेतामध्ये फेकून देऊन त्यातला ऐवज घेऊन गेले.गाडीवान घराच्या बाहेर झोपले होते. दोन वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. तत्पुर्वी शहादेव मोहन शिंदे यांच्या वस्तीवर चोरटे आले असता त्यांच्या घरातील लोक जागे झाले होते. परिसरातील सर्व वस्त्यांना फोन करून जागे केले. गाडीवान यांचा त्यावेळी फोन बंद होता. चोरट्यांनी गाडीवान यांच्या घरावर हल्ला चढविला. याचदरम्यान लहानू गाडीवान हे जागे झाले. त्यामुळे चोरांनी त्यांना चार जणांनीमारहाण केली. बाकीच्या चोरांनी घरात प्रवेश केला घरात त्यांच्या पत्नी आशाबाई गाडीवान, मुलगा राम गाडीवान व त्यांच्या सुन ज्योती राम गाडीवान ह्या घरात होत्या. त्या चोरांनी घरातील चोघांना जबर मारहाण केली. सर्वांना मारहाण करुण लहानु गाडीवान यांच्या छातीवर तलवारीने दोन ते तीन वार केले असल्याचे त्यांच्या घरच्यांनी सांगितले. चोरट्यांनी कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने, ४३ हजार रोख रक्कम, घरातील महत्वाची कागदपत्रे घेऊन चोरटे पसार झाले.शेवगाव पोलीस स्टेशन व बोधेगाव दुरक्षेत्रला दिली. त्यानंतर रात्री पोलीसांनी घटनास्थळी आले. रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या लहानू गाड़ीवान यांना उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले.
शेवगाव तालुक्यातील मुरमी गावात दरोडा : एकास तलवारीने भोकसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:29 IST