शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड, पारनेर तालुक्यात पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:13 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. चक्रीवादळामुळे बुधवारी नगर जिल्ह्यात दिवसभर वादळ, वारे आणि रिमझिम पाऊस होता. जिल्ह्याच्या पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या भागात सायंकाळनंतर जोरदार वादळ व मुसळधार पाऊस झाला. अकोले तालुक्यातील लहित येथे वादळी वाºयाने अंगावर भिंत कोसळून सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तो संगमनेर येथील भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. वादळी वाºयाने २३ जनावरे दगावली आहेत. अकोले (४), कोपरगाव (१),नेवासा (१),पारनेर (५),संगमनेर (७),श्रीरामपूर (२),राहाता (३) अशा सात तालुक्यात २३ जनावरे दगावली. नगर तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, शेवगाव तालुक्यात दोन जण जखमी झाला आहे.-------पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसाननिसर्ग चक्रीवादळाने पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले.  या तालुक्यात ५४० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पाथर्डी तालुक्यातील ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले.