शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

करंडी बनले ग्रीन अँड क्लिन व्हिलेज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:09 IST

कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यालगत करंडी हे आदिवासी गाव सध्या स्वच्छता, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्तीने एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील वाटावे असे ‘द ग्रीन अ‍ॅन्ड क्लीन व्हिलेज’ बनले आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यालगत करंडी हे आदिवासी गाव सध्या स्वच्छता, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्तीने एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील वाटावे असे ‘द ग्रीन अ‍ॅन्ड क्लीन व्हिलेज’ बनले आहे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडे म्हणून करंडी गाव अकोले तालुक्यात प्रत्यक्षात अवतरले आहे.करंडी गावची लोकसंख्या ११७५ आहे. अनुसूचित क्षेत्र (पेसा) तील गाव. गावात २४७ घरे, २४० वैयक्तिक, दोन सार्वजनिक शौचालये वापरात. तर चार शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. करंडी येथील तेवीस वर्षे वयाचा झोपडीवजा घरात राहणाऱ्या सरपंच चंद्रकांत गोंदके यांनी व त्यांचा मित्र परिवार आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ही किमया साधली आहे.करंडी गावात सात वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी मार्च महिन्यातच टँकर सुरू व्हायचे. गावात दोन सार्वजनिक व पाच सहा खासगी शौचालये. गावाला पाणी पुरवठा करणारा आनंददरा तलाव मार्चमध्ये कोरडा व्हायचा.गावातील निम्मे लोक गवंडी व बांधकाम मजुरी करणारे. गावात उन्हाळ्यात गुंठाभरही बागायत नाही. त्यामुळे गाव उजाड वाटायचे, मात्र गावातील सर्व तरुण व गावकºयांनी एकत्र येऊन २०१४ पासून हागणदारीमुक्त गाव व गावातील मुख्य रस्त्यावर झाडे लावणे, गावाला व्यसनमुक्ती करणे हा संकल्प केला. स्वच्छ भारत मिशन या योजनेचे बारा हजार व स्वनिधीचे दोन हजार टाकून व गावातील गवंड्यांनी प्लास्टर, तीव्र उताराचे भांडे, पत्रा, शोषखड्डा, असे २०१८ पर्यंत चार वर्षांत एकशे पन्नास शौचालये पूर्ण केली आहेत. तर गावातील मुख्य रस्त्याला वड, पिंपळ, आशोका, बकुळ, कडूनिंब, शिसव, चिंच असे पाचशे वृक्ष पाच ते सात फुटांपर्यंत वाढले आहेत. त्यांना शंभर लोखंडी संरक्षक जाळ्या, झाडांसाठी अंडरग्राउंड ड्रीपची सोय केली आहे.साथीच्या आजाराला आळागावातील मुख्य ठिकाणी सहा कचरा कुंड्या आहेत. गावात गुटखा , दारू, मटका, जुगार यांचा मागमूसही नाही. गावात पाच भजनी मंडळे, दहा महिला बचत गट ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामसेवक के. बी. इंगळे, पांडुरंग मराडे, दीपक गोंदके, बाबाजी गोंदके, भाऊसाहेब गायकर, दत्ता गोंदके, विजय गोंदके या उच्चशिक्षित तरूणांचे तसेच गावातील दहा महिला बचतगटाच्या अध्यक्ष मंगल गोंदके, छबुबाई ऊंडे, सोनाबाई गोंदके, मंदा गोंदके, आशा गोंदके, कविता गोंदके, उर्मिला गोंदके, कांता गोंदके यांचे मोठे योगदान आहे. गावात शौचालये झाल्यापासून साथीचे आजार खूप कमी झाल्याचे आरोग्य सेविका झुंबर उंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर