शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:53 IST

अहमदनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न, औषध प्रशासनाने जिल्ह्यात खाद्यपदार्थ तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी

अहमदनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न, औषध प्रशासनाने जिल्ह्यात खाद्यपदार्थ तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून २० लाख ४३ हजार ८५२ रुपयांचे खाद्यतेल, २ लाख ८ हजार रुपयांची बर्फी तर १३ हजार रुपयांचे वनस्पती तूप जप्त करण्यात आले आहे़ अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त बी़ एम़ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ दिवाळीनिमित्त मिठाई व खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते़ या काळात ग्राहकांना निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता असल्याने अन्न विभागाने जिल्हाभर तपासणी मोहीम हाती घेतली आहे़ गेल्या पंधरा दिवसांत या विभागातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली़ श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, राहुरी व कर्जत येथे खाद्यतेल विक्री करणाऱ्या प्रत्येकी एका दुकानावर छापा टाकला़ यावेळी तेलविक्रीसाठी जुनेच डबे वापरण्यात येत असल्याचे तसेच खाद्यतेल निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्याने हे तेल जप्त करण्यात आले़ जप्त करण्यात आलेल्या तेलांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तेथील अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे़ नगर शहरात मिठाई विक्री करणाऱ्या एका दुकानावर छापा टाकून ३ लाख ८ हजार रुपयांची बर्फी जप्त करण्यात आली़ दुसऱ्या एका दुकानात आढळून आलेले १३ हजार रुपये किमतीचे २४० किलो वनस्पती तूपही जप्त करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)