शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिके ‘जमिनदोस्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:25 IST

सलग महिनाभर कमी-अधिक सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १५१९ गावांतील सुमारे ४ लाख ८५ हजार शेतक-यांना फटका बसला असून ३ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप, रब्बी पिके जमिनदोस्त झाली आहेत.

अहमदनगर : शेतक-यांना परतीच्या पावसाने दिलासा देण्याऐवजी दगा दिला आहे. सलग महिनाभर कमी-अधिक सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १५१९ गावांतील सुमारे ४ लाख ८५ हजार शेतक-यांना फटका बसला असून ३ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप, रब्बी पिके जमिनदोस्त झाली आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात ही बाब समोर आली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५६ टक्के (७८१ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचून आहे. त्यामुळे सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात कृषी विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला असून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. दुसरीकडे कृषी विभाग व महसूल विभाग प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत आहे. पुढील आठवडाभरात प्रत्यक्ष नुकसानीचे चित्र समोर येईल. त्यानुसार शेतक-यांनी शासनाकडून भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात ५ लाख ९१ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. परतीच्या पावसामुळे  जिल्ह्यातील १ हजार ५१९ गावांतील ४ लाख ८५ हजार ४८९ शेतक-यांना फटका बसला  आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक  व ३३ टक्केपेक्षा कमी अशी स्वतंत्र वर्गवारी केली आहे. यात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र ३ लाख ६४ हजार १४ हेक्टर आहे. तर ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ३५ हजार ७८७ हेक्टर आहे.  यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ५२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, राहाता तालुक्यांचा समावेश आहे. सर्वात कमी बाधित शेतकरी पारनेर तालुक्यात आहेत. अशी आहेत बाधीत पिके सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, गिणी गवत, ऊस, भाजीपाला, कडवळ, कांदा, केळी, भुईमूग, द्राक्षे, डाळिंब, टोमॅटो, भात आणि फळपिके यांचा बाधित पिकांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrop Insuranceपीक विमा