अनिकेत ऊर्फ घाऱ्या शिवम वैभव काळे व सेशन ऊर्फ रोशन ऊर्फ सेशा रायभान भोसले (रा. दोघे साकेगाव, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांसह त्यांच्या दोन साथीदारांनी ८ ऑगस्ट शेवगाव तालुक्यातील भगूर येथील दिलीप संभाजी पवार यांच्या घरात घुसून मारहाण करत ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला होता. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, हेड कॉस्टेबल दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, पोलीस नाईक दीपक शिंदे, शंकर चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.