शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी करा; स्थायी समितीच्या सभापतींचे प्रशासनाला आदेश

By अरुण वाघमोडे | Updated: April 21, 2023 19:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर शहरासह उपनगरात महापुरुषांसह आदर्श व्यक्तींचे २५ पुतळे आहेत. बहुतांशी ठिकाणी मात्र पुतळ्यांजवळ अतिक्रमणामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर शहरासह उपनगरात महापुरुषांसह आदर्श व्यक्तींचे २५ पुतळे आहेत. बहुतांशी ठिकाणी मात्र पुतळ्यांजवळ अतिक्रमणामुळे विद्रूपीकरण झालेआहे. अनधिकृतरीत्या फ्लेक्स लावून पुतळे झाकून टाकले जातात. हे टाळण्यासाठी प्रत्येक पुतळ्याजवळ सूचनाफलक लावून कुणी अतिक्रमण केले अथवा फ्लेक्स लावले तर त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेत सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २१) स्थायी समितीची सभा झाली. सभेला नगरसेवक विनित पाऊलबुधे, प्रदीप परदेशी, रुपाली वारे, पल्लवी जाधव, सुवर्णा कोतकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व विभागप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सभापतीकवडे यांनी पुतळ्यांची काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. ते म्हणाले, शहरात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याची महापालिकेकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही.

बांधकाम विभागाने येत्या चार दिवसांत प्रत्येक पुतळ्याच्या ठिकाणी सूचना फलक लावा, त्यानंतरही पुतळ्याजवळ अतिक्रमण अथवा फ्लेक्स लावले तर संबंधित प्रभाग अधिकारी यांनी हे कृत्य करणाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करवा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.