शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा रोखणा-या तरुणांवर गुन्हे : राहुरी पोलिसांत फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 19:28 IST

प्रवरा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखणाºया कान्हेगाव येथील तरुणांवर ठेकेदारांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तंटामुक्त गावात तस्करांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीरामपूर : प्रवरा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखणाºया कान्हेगाव येथील तरुणांवर ठेकेदारांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तंटामुक्त गावात तस्करांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.नदीपात्रात जातप व करजगाव (ता.राहुरी) येथे रात्री जेसीबी व पोकलॅन यंत्राने होणारा बेकायदा तरुणांनी रोखला होता. मात्र त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठेकेदाराकडून अनेकदा नियम डावलले गेले. हद्द सोडून श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथून उपसा केला गेला. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी धाडस दाखवले. मात्र त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू उपशाचे पंचनामे करुन कारवाई केली नाही तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून ( दि.१२) उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस प्रकाश चित्ते, सामाजिक कार्यकर्ते शाम आसावा यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महसूल खाते व पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. कान्हेगाव येथे मोठा तणाव निर्माण झाला आहे. जातप व करजगाव येथे प्रवरा नदीपात्रात रात्रंदिवस वाळू उपसा सुरु आहे. तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. यापूर्वी गावकºयांनी दोनदा कान्हेगाव हद्दीतील वाळू उपसा रोखला होता. तहसीलदार सुभाष दळवी यांनी स्वत: भेट देऊन पाहणी केली. कान्हेगाव येथील सुमारे एक हजार ब्रास वाळू उपसण्यात आली. मात्र, तहसीलदार दळवी यांनी संबंधीतांना नोटीसा बजावहून उपयोग झाला नाही. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांना या प्रकरणी कारवाई करावी असे सूचविले. मात्र दंड अकारण्यात आला नाही.खोटे गुन्हे दाखल करणे, जिवे मारण्याच्या धमक्या गावकºयांना दिल्या जात आहेत. शनिवारी रात्री वाळू उपसा बंद पाडल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. जेसीबीचा चालक अमोल राजू माने (वय २७) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नदीपात्रात वाळूने भरलेले डंम्पर वर काढण्यासाठी जेसीबी व बुलडोझरचा वापर केला जात होता. त्यावेळी गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली व जेसीबी तसेच डंम्परच्या काचा फोडल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी दादा खरात, सोनू खरात, भावड्या खरात, हनुमंत खरात याचा मुलगा, अमोल खरात व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार अनिल गायकवाड हे करीत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल. खोटे गुन्हे असल्यास उचित कारवाई करू असे त्यांनी सांगितले.अतिरिक्त वाळू उपशाच्या पंचनाम्यावर सह्या करणाºया तरुणांना आरोपी करण्यात आले. तहसीलदार सुभाष दळवी यांच्या आदेशानुसार तलाठी व मंडल अधिकाºयांनी केलेल्या पंचनाम्यावर तरुणांनी सह्या केल्या होत्या. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर