शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

समता पतसंस्थेचा देशातील पतसंस्थांनी आदर्श घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ठेव वाढीमध्येच नाही तर सेवा देण्यात उच्चांक प्रस्थापित केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ठेव वाढीमध्येच नाही तर सेवा देण्यात उच्चांक प्रस्थापित केला असल्याने देशातील बँकांनी या पतसंस्थेचा आदर्श घ्यावा, असे कामकाज समता पतसंस्थेचे आहे. आर्थिक प्रगतीचे पुढचे पाऊल ओळखून समताने पुढील वाटचाल सुरू केली आहे. पुढील ५ वर्षांनंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्रात अव्वल असेल त्यामुळे समताचे अनुकरण इतर सहकार चळवळीतील पतसंस्था करतील, असे गौरवोद्गार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान संचालक सतीश मराठे यांनी काढले.

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा तसेच क़्यू. आर. कोडच्या यू.पी.आय. सिस्टीमचे उद्घा‌टन सतीश मराठे व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे होते. रविवारी ३ जानेवारीपासून घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधा ग्राहक व सभासदांसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रास्ताविक संचालक संदीप कोयटे यांनी केले.

काका कोयटे म्हणाले, समताचा प्रगतीचा प्रवास हा सभासदांचा आमच्यावर असलेल्या विश्वास आणि त्यांची घेत असलेली काळजी होय. आम्ही ग्राहक, सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम व योजनांमधून त्यांना फायदा व्हावा, त्यांना सर्व योजनांची माहिती व्हावी. यासाठी सभासदांच्या दृष्टीने विविध विषयांच्या चित्रफिती तयार करून प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे. कोरोनातही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या. त्यामुळेच समता ही शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे.

या कार्यक्रमाला दादाराव तुपकर, अरविंद महापात्रा, मसऊद अत्तार, समता पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

............

फोटो०४ - कोपरगाव समता पतसंस्था उदघाटन

..

ओळी-

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधांचे उद्घा‌टन सतीश मराठे, उदय जोशी यांनी केले.

040121\img-20210102-wa0013.jpg

समता पतसंस्थेचा घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा श्रीगणेशा करतांना सतीश मराठे, उदय जोशी, काका कोयटे, संदीप कोयटे, सचिन भट्टड.