शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गायीने दिला तीन वासरांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:47 IST

अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतक-याच्या डांगी गायीने तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ही तिनही वासरे धडधाकट आहेत.

राजूर : अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतक-याच्या डांगी गायीने तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ही तिनही वासरे धडधाकट आहेत.     याबाबतची माहिती अशी, काळू भांगरे यांनी आपल्या डांगी जातीच्या गायीस कृत्रीम पध्दतीने रेतन केले होते. पशुधन पर्यवेक्षक सुनील सदगीर यांनी हे कृत्रीम रेतन केले होते. गर्भधारणा वाढीस लागल्यानंतर डॉ. सदगीर वेळोवेळी या गायीची तपासणी करत होते. दिवस पूर्ण झाल्यानंतर या डांगी जातीच्या गायीने तीन वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला. आजपर्यंत गायीने जुळ्या वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र तीन वासरांना जन्म देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. गाय दोन्ही वेळेस एकूण पाच लिटर दूध देत असल्याचे सांगत जन्माला आलेल्या तिन्ही वासरांची चांगली वाढ होईल. आमच्या भागात गायीला तिळे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.‘‘गायीला तिळे होणे ही लाखातील एखादी घटना असते. त्यातही डांगी जातीच्या वळूचे गोठीत वीर्य यासाठी वापरण्यात आले होते. तीनही वासरांचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून या वळूच्या कृत्रीम रेतनाचा नमुना घेऊन त्यांची डी.एन. ए. तपासण्यात येणार आहेत. यामुळे डांगी जातीचे संवर्धन करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे’’ मत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ संतोष वाकचौरे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले