शिक्षक व लोकसहभागातून जमा झालेला १३ लाख रूपये कोरोना निधी खर्ची पडला असून अधिक निधी जमा करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील सर्व गुरुजनांचे यात मोलाचे योगदान आहे.
सुगाव येथील ऑक्सिजन बेड कोविड केअर केंद्र सुरु करण्याकामी शिक्षकांचे भरीव योगदान लाभत आहे. अवघ्या सात ते आठ दिवसात १३ लाख रुपयांची रक्कम शिक्षकांनी उभी केली.
उपलब्ध सर्वच बेड ऑक्सिजन युक्त असणारे राज्यातील हे पहिलेच कोरोना केंद्र असणार आहे.
कोरोना केंद्राला बुधवारी सकाळी आमदार डॉ. किरण लहामटे आणि दुपारी माजी आमदार वैभव पिचड यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी पण पाहणी केली व साधक सूचना केल्या.
म्हाळादेवी येथील ताराबाई व मुरलीधर केरु हासे यांनी एक लाख रुपये मदत निधी केंद्रासाठी दिला. अगस्ती पतसंस्था, बुवासाहेब नवले पतसंस्था व जिल्हा सहकारी बॅंकेचे तालुक्यातील कर्मचारी यांचेकडून प्रत्येकी एक लाख असा निधी या कोविड सेंटरसाठी प्राप्त झाला आहे. वैभव पिचड यांच्याकडून दोन लाख रुपये मदत निधी मिळाला आहे.
...........
रेमडेसिविर इंजेक्शनची तीव्र टंचाई काळात गुरुवारी आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी प्रयत्न करून ४८ रेमडेसिविर मोफत उपलब्ध करून दिले. तहसीलदार मुकेश कांबळे, डाॅ. अजित नवले व डॉ. ज्योती भांडकोळी यांचेकडे रेमडेसिविर इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले आहे.