शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षा आदिक यांची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:57 IST

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दोन प्रांताधिकाऱ्यांची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.

श्रीरामपूर : नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दोन प्रांताधिकाऱ्यांची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.आदिक यांच्या विरोधात उपनगराध्यक्ष करण ससाणे समर्थकांनी पदाच्या दुरुपयोग केल्याची तक्रार नगरविकास खात्याकडे केली होती. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही चौकशी सुरू केली आहे.माजी नगराध्यक्ष संजय फंड, ज्येष्ठ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुजफ्फर शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या श्रीरामपूर व शिर्डी येथील प्रांताधिकारी यांनी चौकशी केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करण्यात आला आहे. नगरपालिकेचे राजकारण त्यामुळे चांगलेच तापले आहे. चौकशीचे कामकाज थांबवावे म्हणून नगराध्यक्षा आदिक यांनी अ‍ॅड. मजहर जहागिरदार यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. नगराध्यक्षांच्या बाबतीत केलेल्या तक्रारीच्या चौकशीचे कामकाज श्रीरामपूर आणि शिर्डी येथे चालू आहे. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी चौकशी होऊ शकत नाही. त्याचबरोबर तक्रारीत दाखल केलेल्या मुद्यांमध्ये तथ्य नाही.त्यामुळे दोन्ही ठिकाणी चालू असलेले चौकशीचे कामकाज थांबविण्यात यावे असे याचिकेत म्हटले होते. त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. आदिक यांच्यावतीने अ‍ॅड.पी.एम. शहा यांनी युक्तीवाद केला तर तक्रारदारांच्यावतीने अ‍ॅड. ज्ञानेश्वर बागुल यांनी कामकाज पाहिले. यावेळी बागुल यांनी बाजू मांडताना म्हटले की, नगराध्यक्षा आदिक यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनुसार शिर्डी आणि श्रीरामपूर येथे चालू असलेले चौकशीचे कामकाज पूर्ण झाले आहे. अनुक्रमे दोन्ही अधिकाºयांनी आपले अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केलेले आहेत.आदिक यांच्या अडचनीत वाढन्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आदिक यांच्यावतीने करण्यात आलेली चौकशीस स्थगितीची मागणी फेटाळून लावत या प्रकरणात राज्य सरकारने पुढील योग्य ती कार्यवाहीचे कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्षा आदिक यांना मोठा धक्का बसला आहे.विरोधक फंड, बिहाणी, नागरे व शेख यांनी आदिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये प्रामुख्याने पदाचा दुरुपयोग, आर्थिक गैरव्यवहार, पालिकेची आर्थिक फसवणूक याबाबी प्रामुख्याने राज्य सरकारकडे मांडल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा आदिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर