शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत फिरणे नगरसेवकाला पडले महागात, श्रीरामपुरात पोलिसांची कारवाई : राजेंद्र पवारांवर गुन्हा दाखल; २५ जणांना हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:02 IST

श्रीरामपूर : शहरात संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्या २५ नागरिकांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे वाहनही पोलिसांनी जप्त करत त्यांच्यासह एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल केला. अत्यावश्यक सेवेचा फलक लावून शहरात फिरणे नगरसेवक पवार यांना चांगलेच महागात पडले आहे.

श्रीरामपूर : शहरात संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्या २५ नागरिकांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे वाहनही पोलिसांनी जप्त करत त्यांच्यासह एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल केला. अत्यावश्यक सेवेचा फलक लावून शहरात फिरणे नगरसेवक पवार यांना चांगलेच महागात पडले आहे.श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी धडक मोहीम हाती घेतली. संचारबंदीचे सर्व नियम मोडून भटकणाºया व अत्यावश्यक सेवेचे फलक लावून कायदा पायदळी तुडवणारा नागरिकांवर पोलिसांनी जरब बसवला. शहरातील मुख्य रस्ता, शिवाजी रस्ता, संगमनेर रस्ता, नेवासे रस्ता व बेलापूर रस्त्यावर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ते थोड्याच वेळात निर्मनुष्य झाले.पोलिसांनी केलेल्या कारवाईत नगरसेवक राजेंद्र पवार हे देखील सुटू शकले नाहीत. नगरसेवक पवार हे गेल्या काही दिवसांपासून धान्य वाटप तसेच औषध फवारणीचे काम करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात झळकले होते. त्यांच्या कारला अत्यावश्यक सेवेचा फलकही लावण्यात आला होता. त्यांच्या कारसह रिक्षा जीप व दुचाकी अशा २५ वाहनावर कारवाई करत ते शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांना संचारबंदीच्या काळात शहरात फिरण्यास बंदी घातली होती अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी लोकमतला दिली. नगरसेवकांनी अत्यावश्यक कामासाठी प्रशासनाला सूचना द्यावी. मात्र विनाकारण रस्त्यावर फिरू नये अशी जिल्हाधिकाºयांची सूचना होती. संपूर्ण जिल्ह्यासाठी ते लागू आहेत. मात्र तरीहीशहरात नगरसेवक फिरताना आढळून आले होते.या कारवाईमुळे आता शहरात अनावश्यक फिरणाºया राजकीय कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी यांना चाप बसणार आहे. शहर पोलिसांनी उशिरा का होईना कारवाई केली आहे.श्रीरामपुरात आपल्या प्रभागातील नगरसेवक संचारबंदी च्या काळात काय करत आहे याविषयीचे मेसेज सोशल मीडियावर झळकत होते. त्यातून नगरसेवकांचे सामाजिक कायार्चे छायाचित्रे टाकली जात होती. नागरिकही आवडीने हे विषय चघळत होते.