कोपरगाव : शहरातील निवारा परिसरात नगरसेवक जनार्दन कदम व दीपा गिरमे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे झाली आहे. तर काही कामे लोक वर्गणीतूनही केली जात आहे. त्यामुळे नगरसेवकांनी जनतेच्या हिताची अशीच कामे सदैव करावीत, असे मत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.
शहरातील निवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर, येवला रोड, आढाव वस्ती, साई-सिटी, सह्याद्री कॉलनी, द्वारका-नगरी, शंकरनगर, ओमनगर या परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षेसाठी प्रभाग क्रमांक दोनमध्ये रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीनचा शुक्रवारी (दि.१९) शिवजयंती निमित्त कोयटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या अध्यक्षा पुष्पलता सुतार, अमृत संजीवनचे अध्यक्ष पराग संधान, शिवसेना गटनेते योगेश बागुल, माजी नगरसेवक बबलू वाणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, नगरसेवक संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते अकबर शेख, निसार शेख, लक्ष्मीनारायण भट्टड, निवारा सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेंद्र व्यास, अमोल महापुरे, प्रमोद नरोडे, श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळ कार्याध्यक्ष विष्णुपंत गायकवाड, तुषार आहेर, अमोल राजूरकर, प्रताप जोशी, गौरव अग्रवाल, संजय पोटे, राजेंद्र पाटणकर, ज्ञानदेव ससाने, पोपट वीर, विजय बोथरा, गन्नाथ बैरागी, नंदिनी कदम, विमल कर्डक आदींसह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नगरसेवक जनार्दन कदम केले तर वैभव गिरमे यांनी आभार मानले.
...
--