शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी ठरवली राठोड यांची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:55 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची चितळे रोडवरील शिवालयात बैठक झाली. उपस्थित नगरसेवकांनी एकमताने अनिल राठोड यांच्याच नावाला संमती दिली

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची चितळे रोडवरील शिवालयात बैठक झाली. उपस्थित नगरसेवकांनी एकमताने अनिल राठोड यांच्याच नावाला संमती दिली. यावेळी इतर नगरसेवकांनी त्यांच्या समर्थकांना आवर घालावा, असा सल्लाही शहरप्रमुखांनी दिला. दरम्यान राठोड हेच विधानसभेचे उमेदवार असतील, आपण निवडणूक लढविणार नाही, असे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी बैठकीत जाहीर केले.विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यात उतावीळ कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या नावाने ‘भावी आमदार’ म्हणून पोस्ट व्हायरल केल्या आहेत. शनिवारी सकाळी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या समर्थकांनी ‘भावी आमदार’ अशा पोस्ट व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्या पार्श्वभूमीवर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी रविवारी सकाळी तातडीने बैठक घेतली. या बैठकीला सर्व नगरसेवक, नगरसेविकांचे पतीराज उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अनिल राठोड हेच विधानसभेचे पक्षाचे उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब केले. आता कोणीही यापुढे दावा सांगणार नाही. नगरसेवकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घाला, असा सबुरीचा सल्लाही बैठकीत देण्यात आला. बैठकीच्या सुरवातीलाच संभाजी कदम यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी पोस्ट व्हायरल केल्या होत्या. विधानसभा निवडणूक लढविणार नसून अनिल राठोड हेच आमचे उमेदवार असतील, असेही कदम यांनी सांगितले.राठोड हेच विधानसभेचे उमेदवार असतील, यावर सर्व नगरसेवकांचे एकमत झाले. शिवसेनेची उमेदवारी ही मातोश्रीवरून ठरते. राठोड यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे, यात काहीही शंका नाही. तरीही खबरदारी म्हणून सेनेचे सर्व नगरसेवक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांनाच उमेदवारी देण्यासाठी साकडे घालणार आहेत, असे बैठकीत ठरले.शिवसेनेचे शहरप्रमुख पद हे शहरात महत्त्वाचे मानले जाते. राठोड यांच्या विश्वासातील व्यक्तीच शहरप्रमुख होते. यापूर्वी संभाजी कदम शहरप्रमुख होते. पत्नी महापौर झाल्यानंतर त्यांना पदाचा त्याग करावा लागला. सध्या कदम यांच्याकडे कोणतेही पद नाही. शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या कामगिरीवर राठोड खूश आहेत. अडीच वर्षात महापौर सेनेचा असूनही विकासाचा वाटा प्रभागात न आल्याने नगरसेवकांची नाराजी होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर