शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक पुत्राकडून महापालिका कामगारांना मारहाण; कामगारांचा पालिकेवर मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 17:00 IST

शहरातील झेंडीगेट परिसरात ड्रेनेजचे काम करत असताना महापालिकेच्या दोघा कामगारांना अपक्ष नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केली. या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

अहमदनगर : शहरातील झेंडीगेट परिसरात ड्रेनेजचे काम करत असताना महापालिकेच्या दोघा कामगारांना अपक्ष नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुजाहीद कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढला. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ याप्रकरणी चंद्रकांत दगडू चव्हाण (वय ५२ रा. कवडेनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. चव्हाण व त्यांचा सहकारी विजय भसुते हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झेंडीगेट परिसरातील जुने नगर तालुका पोलीस ठाणे परिसरात ड्रेनेज दुरूस्तीचे काम करत होते. यावेळी मुजाहिद कुरेशी याने तेथे येऊन चांगले काम करत नसल्याचे म्हणत चव्हाण यांना मारहाण केली. या घटनेबाबत चव्हाण यांनी बंगाली चौक येथे उपस्थित महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक रामदीन व भोर यांना माहिती दिली.यावेळी कुरेशी याने तेथे येऊन अधिका-यांसमोरच विजय भसुते यांना मारहाण केल्याचे चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुजाहिद कुरेशी हा अपक्ष नगरसेविका ख्वाजाबी कुरेशी यांचा पुत्र आहे. कुरेशी या राष्ट्रवादीच्या समर्थक आहेत. या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक दीप चव्हाण, मुद्दसर शेख, कामगार संघटनेचे सचिव आनंद वायकर आदींनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना घेराव घालत कारवाईची मागणी केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिकाahmednagar policeअहमदनगर पोलीस